कापूस बाजार भाव

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कापूस बाजार भाव तेजीत सध्या काय मिळतोय दर cotton rate

cotton rate मागील अनेक दिवसांपासून मंदीच्या झळ्या सहन करणाऱ्या कापूस बाजारात गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिलासादायक वाढ दिसून येत आहे. कापसाच्या दरात 100 ते 200 रुपयांची वाढ झाली असून, सध्या कापसाला 6800 ते 7200 रुपये पर्यंत दर मिळत आहे. काही ठिकाणी तर कापसाचा दर 7500 रुपयांच्या पुढे गेला आहे.

पुढील काळात कापूस बाजार भाव आणखी वाढ:

बाजार तज्ञ राजेश जाधव यांच्या मते, पुढील काळात कापसाच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा देशात पावसाचे प्रमाण कमी असल्याने कापूस उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे.

त्याचबरोबर बाजारातील आवकही कमी आहे. याच वेळी, कापड उद्योगाकडून कापसाची मागणी वाढत आहे. जागतिक बाजाराचा विचार करता भारतीय कापूस हा स्वस्त असल्याने निर्यात वाढण्याची शक्यता आहे.

कापूस बाजार भाव 10 ते 15 टक्क्यांनी वाढ:

जाधव यांच्या मते, जवळच्या काळात कापूस 10 टक्क्याने वाढू शकतो तर मे महिन्याच्या कालावधीपर्यंत कापूस बाजार भाव 15 टक्क्यांनी वाढतील. याचा अर्थ कापसाला सरासरी 7500 ते 8000 रुपये पर्यंत दर मिळू शकतो.

शेतकऱ्यांना सल्ला:

शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन आपल्या मालाची टप्प्याटप्प्याने विक्री करावी. असे केल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळू शकतात.

टीप: हे लक्षात घ्यावे की हा केवळ अंदाज आहे. बाजारातील स्थिती अनेक घटकांवर अवलंबून असते. तसेच कोणत्याही अभ्यासकाची माहिती पुरेपूर खरी ठरेल याची शाश्वती नसते. तसेच शेतकऱ्यांनी बाजाराकडे लक्ष ठेवून योग्य त्यावेळी आपल्या मालाची विक्री करणे हे फायदेचे ठरते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *