कर्जमाफी

शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी इतका निधी उपलब्ध पहा शासन निर्णय

पुणे, 29 डिसेंबर 2023 – राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार आणि वस्त्रोद्योग विभागाला देखील 1176 कोटी रुपयांची पुरवणी मंजूर करण्यात आली आहे. या पुरवणीचा वापर शेतकऱ्यांचे कर्जमाफी, शेतकऱ्यांना अल्पदरात पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सवलती, कांदा अनुदान अशा विविध बाबींसाठी करण्यात येणार आहे.

या पुरवणीतून सहकारी पतसंस्थांना व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य बाबीसाठी 300 कोटी 166 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जाणारा पीक कर्जामध्ये 1% व्याज सवलत देण्यासाठी सहकार आणि वस्त्रोद्योग विभागाला 218 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना नियमित कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना माफ केले जाणारे शासनाचे व्याज सवलत योजनासाठी 100 कोटी रुपयांचा निधी सहकार आणि वस्त्रोद्योग विभागाला देण्यात आला आहे. तसेच, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला 300 कोटी रुपयांचा निधी देखील या पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय, विणकरांना गणपतीच्या पाठीवरती दिला जाणारा उत्सव भत्ता आणि विणकराला दिली जाणारी 200 युनिटपर्यंत मोफत वीज अशा प्रकारच्या इतर बाबींसाठी देखील निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या पुरवणीचा वापर करण्यासाठी सहकार विभागाने खर्चाचे विवरणपत्र गृह आणि वित्त विभागाकडे सादर केले आहे. गृह आणि वित्त विभागाच्या मंजुरीनंतर सहकार विभागाकडून कांदा अनुदानासाठी आवश्यक असलेला निधी टप्प्याटप्याने वितरीत केला जाईल. 

या संदर्भातील ज्या योजनांसाठीचा निधी वितरित होईल त्या योजनांसाठी स्वतंत्रपणे जीआर निर्गमित केले जातील. त्यानंतर शेतकऱ्यांना व्याज सवलत किंवा शेतकऱ्यांचा कांदा अनुदान वितरित केले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *