पाऊस

राज्यात रवि-सोमवारी हलक्या पावसाची पाऊस! शेतकऱ्यांची चिंता वाढली!

हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, रविवार आणि सोमवार २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी राज्यातील काही भागात हलका पाऊस पडू शकतो. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

विदर्भात पाऊस:

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वीज आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यात पाऊस:

परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे.

हवामान विभागाचा सल्ला:

हवामान विभागाने अमरावती, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वीज आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या शहरांमधील काही ठिकाणी हलके पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहून योग्य ते नियोजन करावे असा सल्ला हवामान विभाग करून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली:

सध्या राज्यातील गहू, ज्वारी आणि हरभरा या प्रमुख पिकांची काढणी सुरू आहे. पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसापूर्वी राज्यातील बऱ्याच भागात गारपीट झाल्याने शेती पिकांचे नुकसान झाले होते. तसेच विदर्भातील काही बाजारपेठेत तूर भिजल्याचीही वृत्त होती.

हवामान अंदाज पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप:

हवामान अंदाज पाहण्यासाठी आपण हवामान विभागाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *