पाऊस

राज्यात पावसाची शक्यता, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पाऊस

मुंबई: राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. त्याचबरोबर उन्हाचा चटकाही वाढला आहे. हवामान विभागाने आज विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा दिला आहे.

दक्षिण गुजरात आणि लगतच्या भागावर हवेची चक्रीय स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रापासून ते अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा पसरला आहे. यामुळे बंगालच्या उपसागरातून आर्द्र वारे वाहणार आहेत. हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे.

पावसाचे वातावरण निवळल्यानंतर राज्यातील थंडीही कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार:

  • विदर्भ: बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता आहे.
  • मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *