मोदी आवास योजना

मोदी आवास योजना कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ सविस्तर माहिती पहा Modi aavas yojana

Modi aavas yojana राज्यात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाचा वापर करून घरे बांधणे परवडत नाही, अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून घरे दिली जातात. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि मोदी आवास योजना यांचा समावेश आहे.

हे वाचा;  गाई म्हशी अनुदान वाटप योजना महाराष्ट्र राज्य

राज्याने मोदी आवास योजना सुरू केली असून, या योजनेसाठी शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. या लेखात आपण मोदी आवास योजनेसाठी कोण पात्र असेल, या योजनेअंतर्गत घरासाठी किती रक्कम दिली जाईल आणि मोदी आवास योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया याविषयी चर्चा करू.

मोदी आवास योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार?

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजना राबविण्यात येणार आहे. याशिवाय, ज्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांचाही मोदी आवास योजनेत समावेश केला जाईल. घरकुल यादीतून वगळलेल्या किंवा प्रणालीतून अपात्र ठरलेल्या, परंतु ग्रामपंचायतीनुसार पात्र असलेल्या व्यक्तींना घरकुल दिले जाईल.

मोदी आवास योजनेंतर्गत घरासाठी किती रुपये मिळतील?

इतर घरकुल योजनेप्रमाणे मोदी आवास योजनेचे अनुदान एक लाख वीस हजार रुपये (1,20,000) असून मोदी आवास योजनेअंतर्गत (10 लाख) घरे पुढील तीन वर्षांत बांधण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

मोदी आवास योजनेसाठी कोठे अर्ज करता येईल?

मोदी आवास योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतील. याशिवाय, घरकुल योजनेसाठी, मोदी आवास योजनेची उप-श्रेणी, इतर सर्व मागास प्रवर्गातून तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून वगळलेल्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले जातील.

हे वाचा; प्रधानमंत्री कुसुम सौर योजना संपूर्ण माहिती पहा.

योजनेचा शासन निर्णय – 1 (GR) येथे पहा

योजनेचा शासन निर्णय  -2 (GR) येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *