पीएम किसान सन्मान निधी

पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता तारीख जाहीर.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील, म्हणजेच सोळावा हप्ता २८ फेब्रुवारी २०२४ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. हे पूर्वीपासूनच कृषी विभागाच्या माध्यमातून कळवण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा असल्यामुळे, वितरण प्रक्रिया सुरू आहे.

आज २१ फेब्रुवारी पर्यंत एक विशेष अभियान राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची केवायसी, बायोमेट्रिक वेरिफिकेशन, बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे आणि फिजिकल व्हेरिफिकेशन चा डाटा अपडेट करणे या सर्व प्रक्रिया राबवल्या जात आहेत.

आज शेवटची तारीख आहे. आज केवायसी करणारे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता २८ फेब्रुवारी २०२४ रोजी मिळवू शकतील.

पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता २८ फेब्रुवारीला जमा होणार असला तरी, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता त्याच तारखेला जमा होईल का?

गेल्या एक ते दीड महिन्यापासून आपण सातत्याने या योजनेच्या अपडेट घेत आहोत. लोकसभा निवडणुका 16 एप्रिल २०२४ रोजी होणार आहेत. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू होते आणि त्यापूर्वीच या योजनांचे वितरण करणे आवश्यक आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता २८ फेब्रुवारी २०२४ रोजी जमा केला जात असतानाच, आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून सीएम किसान सन्मान शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता सुद्धा वितरित केला जाऊ शकतो असा अंदाज आहे.

यासाठी आणखी तीन ते चार दिवसाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये कृषिमंत्री यांच्या माध्यमातून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

आजही जर कोणाचे केवायसी बाकी असेल तर तुम्ही:

  • पीएम किसान वेबसाईट
  • पीएम किसान ॲप्लिकेशन
  • जवळच्या सीएससी सेंटर

या माध्यमातून केवायसी करू शकता.

तुम्हाला काही समस्या असल्यास कृषी सहायकांशी संपर्क साधा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *