पीएम किसान

पीएम किसान योजना 20 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा लाभापासून वंचित राहाल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला पात्र होण्यासाठी काही बाबी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याच्या बँक खात्याला आधार सिडिंग झालेला असणे गरजेचे आहे. याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या फिजिकल वेरिफिकेशनमध्ये नाव आले आहे, अशा लाभार्थ्यांचा फिजिकल वेरिफिकेशन झालेला असणे आवश्यक आहे.

हे वाचा; कुसुम सोलर योजना लवकरच करा हे काम अन्यथा योजनेतून अपात्र होताल.

आतापर्यंत गेले काही हप्ते वितरित करत असताना, ई-केवायसीचीअट शिथिल करून, अशा लाभार्थ्यांना हप्तांचे वितरण केले जात होते.

परंतु राज्यातील लाखो लाभार्थी आज देखील ई-केवायसी करण्यापासून बाकी आहेत. आणि अशा सर्व लाभार्थ्यांना आता ही शेवटची संधी देण्यात आलेली आहे.

म्हणून, 20 सप्टेंबर 2023 पर्यंत पीएम किसान योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी म्हणून लाभार्थी पात्र आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी.

हे वाचा; शेतकऱ्यांसाठी मोठी चिंतेची बातमी रासायनिक खत होणार आता विक्रमी दरवाढ.

असे आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

20 सप्टेंबरपर्यंत जे लाभार्थी आपली ई-केवायसी करणार नाहीत, आधार प्रमाणिकरण करणार नाहीत किंवा ज्यांच्या फिजिकल वेरिफिकेशनमध्ये नाव आले ते आपली कागदपत्रे जमा करणार नाहीत, अशा लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर 2023 नंतर या योजनेमधून सरसकट बाद केले जाणार आहे.अर्थात हे शेतकरी आता ₹12,000 च्या अनुदानाला मुकणार आहेत.

पीएम किसान चे पात्र असलेला लाभार्थी, तोच सीएम किसान अर्थात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र केले जाणार आहे.

हे वाचा; भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड यादी Mahadbt lottery list

पीएम किसान च्या पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी नमो शेतकरी सन्मान निधी च्या हप्त्यासाठी वापरली जाणार आहे. या दोन्ही पोर्टलचे एकत्रीकरणाचा काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि 20 सप्टेंबर नंतरही ई केवायसी झालेले, पात्र झालेला लाभार्थी, तोच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी सुद्धा घेतले जातील.

एकंदरीत आपण जर पाहिजे, तर राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा ₹6000 अनुदान दिले जाणार आहे. ज्यासाठी शेतकरी मोठ्या प्रतीक्षेत आहेत.

हे वाचा; कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणतात राज्यात दुष्काळ जाहीर होणार का पहा.

साधारणपणे जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये या पहिल्या हप्त्याचे वितरण होणे आवश्यक होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव हे वितरण अद्याप देखील झालेले नाही.

साधारणपणे सप्टेंबरमध्ये गौरी गणपतीपूर्वी होईल, अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. परंतु अद्याप देखील राज्य शासनाच्या माध्यमातून त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

सर्व प्रक्रिया पूर्ण झालेले असताना सुद्धा शासनाच्या माध्यमातून त्यामध्ये दिरंगाई केली जाते.

हे वाचा; मोदी आवास योजना कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ सविस्तर माहिती पहा

आता अंतिम पात्र झालेल्या लाभार्थ्यांसह नमो शेतकरी ची यादी फायनल केली जाणार आहे.

साधारणपणे 17 सप्टेंबर 2023 रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या बैठकीमध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधीचा हप्ता ची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून हप्ता गौरी गणपतीच्या दरम्यान वितरित केला जाईल, अशाप्रकारे सांगितले जाते.

हे वाचा;  गाई म्हशी अनुदान वाटप योजना महाराष्ट्र राज्य

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *