पंजाबराव डख

पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज जाहीर वातावरणात बदल ऑक्टोबर महिन्यात पाऊस कसा Panjabrao Dakh weather forecast

प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख Panjabrao Dakh weather forecast यांनी याआधी नवरात्रीदरम्यान पावसाचा 

अंदाज वर्तवला होता, मात्र आज 3 ऑक्टोबर रोजी त्यांनी हवामानाचा नवीन अंदाज दिला आहे.

हेही वाचा; पहा या शेतकऱ्यांनी कमावले सहा एकरातून तब्बल 90 लाख रुपये प्रताप लेंडवे यांची यशाची कहाणी

या अंदाजामध्ये, त्यांनी राज्यातील पावसाची वेळ आणि शेतकर्‍यांना सोयाबीनची काढणी सुरू करण्यासाठी योग्य वेळ यासंबंधी अतिरिक्त माहिती दिली आहे. डख साहेबांना नेमका काय अंदाज दिला आहे पाहूयात खालील प्रमाणे.

ताज्या अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख सांगतात. काही विशिष्ट भागात अंदाजे 10 किंवा 20 मिनिटे चालणाऱ्या हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात, तरीही पंजाबराव डखानी शेतकऱ्यांना सोयाबीन काढण्यासाठी यंदा योग्य वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा; सध्या कापुस बाजार भाव किती मिळतोय cotton market price

पंजाबराव डख यांच्या मते, यावर्षी जूनमध्ये पाऊस कमी झाला, त्यानंतर जुलैमध्ये मुबलक पाऊस झाला. ऑगस्टमध्ये कोरड्या वातावरणानंतर सप्टेंबरमध्ये आणखी एकदा राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली.

शिवाय, ऑक्टोबर महिन्यात पाऊसमान कमी असेल, परंतु नोव्हेंबरमध्ये पुन्हा पाऊस सुरू होण्याची अपेक्षा आहे. पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की, चालू वर्षात दिवाळीदरम्यान पाऊस अपेक्षित आहे.

हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची लवकरात लवकर काढणी करून हरभरा पेरणीची तयारी करावी, असा सल्ला डख यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

हेही वाचा; ई-पीक पाहणीसाठी 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख लवकरच करा आपली पिक पाहणी अन्यथा विमा भेटणार नाही.

हरभरा पेरणीसाठी योग्य वेळ, हरभऱ्याचे विविध प्रकार, पेरणीसाठी योग्य अंतर, खत आणि पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पंजाबराव डाख यांचा YouTube व्हिडिओ पाहण्याची शिफारस केली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *