पंजाबराव डख

पंजाबराव डख म्हणतात राज्यातील या भागात पावसाची शक्‍यता.

मुंबई, 19 जानेवारी 2024 – सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डख यांच्याकडून 19 जानेवारी रोजी नवीन अंदाज प्रसारित करण्यात आला आहे. या अंदाजानुसार महाराष्ट्रात लवकरच काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

सध्या महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पावसाची धास्ती आहे. परंतु पुढील दोन ते तीन दिवस राज्यात असे वातावरण राहील.

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र यासह कोकण परिसरात थंडी असेल. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही.

25 जानेवारी पर्यंत मराठवाड्यात दिवसा ढगाळ वातावरण असेल तर रात्री थंडी जाणवेल. पश्चिम विदर्भात दिवसा ढगाळलेले वातावरण राहील.

पूर्व विदर्भातील अमरावती, चांदुर बाजार, दर्यापूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक भागात पावसाच्या हलक्या सरी राहतील असा अंदाज श्री डख यांनी वर्तवला आहे.

असे वातावरण फक्त राज्यातील पूर्व विदर्भात राहील. इतरत्र पावसाची शक्यता नसल्याचे श्री डख यांनी सांगितले.

श्री डख यांनी सांगितले की, असे ढगाळलेले वातावरण तुरळक पावसाच्या सरी 25 जानेवारीपर्यंत पूर्व विदर्भात राहतील. मात्र या पावसाची शक्यता तुरळक राहील. यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *