पीएम किसान

नमो शेतकरी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्याची शेवटची संधी PM Kisan Samman Nidhi Yojana.

PM Kisan Samman Nidhi Yojana पीएम किसान सन्मान निधी योजनेसह नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ताच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना बरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 

21 फेब्रुवारी 2024 पर्यंत राज्यामध्ये विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. या मोहिमेच्या अंतर्गत  शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रमाणीकर, योजनेसाठी नव्याने नोंदणी,  बॅंक खाते, आधार क्रमांक जोडणी आदि बाबीची पूर्तता केली जाणार आहे आणि यासाठी  शेतकऱ्यांनी समक्ष  राहणे आवश्यक आहे. 

शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी मोबाईलवर ओटीपी आधारित प्रमाणीकरण, सीएससी केंद्र आणि पीएम किसान ऍप्लिकेशनद्वारे फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया (ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे घेतले जातात) यापैकी एका सुविधांचा वापर केला जाणार आहे.

बँक खाते आधारशी लिंक नसलेल्या शेतकऱ्यांना जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस बँकेत आधारशी लिंक केलेले खाते उघडावे लागेल. 

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी 2024  शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. मोहिमेत योजनेच्या निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळेल.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेबाबत महत्वाची सूचना

डॉ. प्रवीण गेडाम यांनी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र ठरणे आवश्यक आहे.

यापूर्वी, 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये राज्य शासनाने 45 दिवसांची मोहीम राबवली होती. या मोहिमेमध्ये 1,04,000 शेतकऱ्यांची नोंदणी  आधार प्रमाणीकरण ई केवायसी करण्यात आली होती, तर स्वयं नोंदणीकृत केलेल्या 3,01,000 शेतकऱ्यांची नवीन नोंदणी मंजूर करण्यात आली होती.

राज्यातील शेतकऱ्यांच्या केवायसीसाठी विशेष मोहीम

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी यांना कृषी आयुक्तांच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले आहेत. या अंतर्गत, आपण आपले केवायसी पूर्ण करू शकता, आपल्या समस्यांचे निराकरण करू शकता किंवा या योजनेच्या संदर्भातील अधिक माहिती मिळवू शकता. 

यासाठी आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

राज्याचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), दिलीप झेंडे यांनी शेतकऱ्यांना केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे केवायसी बाकी आहे. त्यामुळे राज्य शासनाने ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.

या योजनेमध्ये नवीन नोंदणी केलेल्या आणि पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाही समाविष्ट करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ताही वितरित करण्यात येणार आहे. तर, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना यांच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचे अपडेट होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *