थकीत अतिवृष्टी अनुदान मंजूर

थकीत अतिवृष्टी अनुदान मंजूर पहा शासन निर्णय

गेल्या तीन वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आहे.

2020, 2021 आणि 2022 या तीन वर्षांमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या परंतु अद्यापही अनुदानाचे वाटप न झालेल्या, अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान वितरित करण्यासाठी आज 21 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

याचसंदर्भातील सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

2020 मध्ये, 2021 मध्ये अतिवृष्टीने आणि 2022 मध्ये अतिवृष्टी-वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी वाटप केला होता. परंतु हा निधी वाटप करताना, कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याच महसूल मंडळातील पात्र झालेल्या शेतकऱ्यांना निधीचे वितरण करण्यात आलेलं होतं. बरेच सारे प्रस्ताव असताना सुद्धा ते मंजूर करण्यात आले नव्हते.

थकीत अतिवृष्टी अनुदान मंजूर माहिती व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

जून 2023 मध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, 403 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात येऊन 2022 मध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले होते. परंतु याच्या नंतर देखील 2020, 2021 आणि 2022 मधील बऱ्याच शेतकऱ्यांच्या कर्ज वाटप करण्यात आले नव्हते. 2023 मध्येही तीच परिस्थिती आहे.

थकीत अतिवृष्टी अनुदान मंजूर माहिती व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशा या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदान वितरित करण्यासाठी अखेर आज 21 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाच्या माध्यमातून 106 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यांच्या संदर्भातील जीआर निर्गमित करण्यात आले आहे आणि त्याच्यासोबत एक सहपत्र जोडण्यात आले आहे.

या जीआर च्या माध्यमातून रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 2019 ते 2022 या काळात झालेल्या नुकसानीसाठी 2 कोटी 52 लाख 32 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निधीमध्ये अतिवृष्टी, पूर, दुष्काळ आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई समाविष्ट आहे.

नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये 2019 ते 2022 या काळात झालेल्या नुकसानीसाठी 30 कोटी 49 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निधीमध्ये 2022 मधील गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठीही भरपाई समाविष्ट आहे.

थकीत अतिवृष्टी अनुदान मंजूर माहिती व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिक विभागातील जळगाव, नाशिक, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये 2019 ते 2022 या काळात झालेल्या नुकसानीसाठी 52 कोटी 36 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निधीमध्ये 2023 मधील गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठीही भरपाई समाविष्ट आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये 2019 ते 2022 या काळात झालेल्या नुकसानीसाठी 10 कोटी 98 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निधीमध्ये दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीसाठीही भरपाई समाविष्ट आहे.

अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यासाठी 2 लाख 85 हजार रुपये आणि पुणे जिल्ह्यासाठी 18 लाख 90 हजार रुपये असे निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निधीमध्ये पूर आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई समाविष्ट आहे.

या मंजुरीमुळे राज्यातील 686 कोटी रुपयांच्या थकीत असलेल्या निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निधीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

थकीत अतिवृष्टी अनुदान मंजूर माहिती व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *