कांदा अनुदान

चौथ्या टप्प्यातील कांदा अनुदान वितरण: 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा!

मुंबई: गेल्या वर्षी कांद्याच्या दरात घसरण झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत केंद्र व राज्य शासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर राज्य सरकारने 200 क्विंटलच्या मर्यादेत प्रति क्विंटल मागे 350 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. 

हे अनुदान तीन टप्प्यात वितरित करण्यात आले आहे आणि आता उर्वरित चौथ्या टप्प्याचे वितरण 8 फेब्रुवारी 2024 रोजी निश्चित करण्यात आले आहे.

पुढील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार चौथ्या टप्प्यातील कांदा अनुदान:

  • सोलापूर
  • धाराशिव
  • नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • बीड
  • पुणे
  • धुळे
  • नाशिक
  • जळगाव
  • कोल्हापूर

या जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना चौथ्या टप्प्यात कांद्याचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

कांदा अनुदान शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी: ..येथे क्लिक करा..

या निर्णयामुळे 10 जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *