कांदा अनुदान

कांदा अनुदान संदर्भात महत्त्वाची अपडेट

कांदा अनुदान फेब्रुवारी 2023 मध्ये, कांदा बाजार भाव लक्षणीय रित्या घसरले. याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यावर झाला शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले पिकाचा आर्थिक खर्च निघत नसल्याने राज्यातील विविध भागातून शेतकऱ्यांनी थेट मुंबईकडे आपला मोर्चा वळविला.

या मोर्चाने कांदा अनुदानाकडे लक्ष वेधून घेत. शासनाचे डोळे उघडे केले परिणामी, राज्य सरकारने 350 रुपये रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 दरम्यान लाल कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना 350 प्रति क्विंटल. एकूण अनुदानाची रक्कम रु. जळगाव जिल्ह्यातील 6398 शेतकऱ्यांसाठी 12 कोटी 49 लाख 38 हजार 553 रुपयांचे अनुदान उपलब्ध झाले आहे, लवकरच हा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये कांदा बाजार भाव कमी झाल्याने नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संबंधित कालावधीत जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये एकूण 661,411 क्विंटल कांद्याची विक्री झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान मिळणार आहे. 

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने राज्य सरकारकडे 231,610,175 रुपयांचा अनुदानाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे राज्य सरकारने 53.94 टक्के अनुदानाचे वितरण केले आहे. जिल्ह्यातील उत्पादकांसाठी 12 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित 10,667,9200 रुपयांची सबसिडीही लवकरच दिली जाईल.

बाजार समितीकडून अनुदान पात्र असणारी लाभार्थी. ( कांदा अनुदान )

बाजार समिती लाभार्थी आवक (क्विंटल) आवश्यक अनुदान
चाळीसगाव 2,927 2,00,069 7,00,24,998
अमळनेर 2 144 50,610
बोदवड 333 60,491 2,11,71,969
भुसावळ 31 5,278 18,05,720
जळगाव 1,333 11,0064 3,85,22,460
चोपडा 911 1,47,741 5,18,75,131
यावल 860 1,37,530 4,81,35,655
पाचोरा 1 91 31,909

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *