ई-पीक पाहणी

ई-पीक पाहणीसाठी 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख लवकरच करा आपली पिक पाहणी अन्यथा विमा भेटणार नाही E-Peek Pahani.

बीड, 2 ऑक्टोबर 2023: जिल्ह्यात खरीप हंगामातील (Kharif season) ई-पीक पाहणीची गती वाढविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 80 हजार 315 शेतकऱ्यांनी 4 लाख 29 हजार 506 हेक्टर क्षेत्रावर पीक पाहणी केली आहे. 

हेही वाचा; राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाणे वाटप MahaDBT Farmer Scheme

अंतिम टप्पा असल्याने शेतकऱ्यांनी पीक पाहणीची गती वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) करण्यासाठी 25 सप्टेंबर हे शेवटची तारीख (last date) होती; परंतु त्यात आता वाढ करण्यात आली आहे. शेतकरी आता 15 ऑक्टोबरपर्यंत (October) ई-पीक पाहणी करू शकतील.

ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. शेतकरी आपल्या स्वतःच्या मोबाइल अॅपवरून आपल्या सात-बारावरील विविध पिकांची नोंदणी करू शकतील.

पाऊस 

मागच्या वर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून, शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे.

हेही वाचा; नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता वितरणाची तारीख जाहीर होणार लवकरच.

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी ई-पीक पाहणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. ई-पीक पाहणी केल्यास, शेतकऱ्यांना पीकविमा, पीककर्ज, शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यास मदत होईल.

हेही वाचा; रब्बी पीक विमा अनुदानाची मंजुरी, शेतकऱ्यांना लवकरच मिळणार लाभ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *