पिक विमा

अखेर या जिल्ह्यातील इतक्या मंडळांना 2023 खरीप पिक विमा मंजूर Crop Insurance

Crop Insurance अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या खंडामुळे सोयाबीन पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने 41 महसूल मंडळांना पिक विमा वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. या 41 महसूल मंडळांमध्ये अंजनगावसुर्जी, भातुकली, धामणगाव, चिखलदरा, चांदूर रेल्वे, धारणी आणि दर्यापूर तालुक्यातील महसूल मंडळांचा समावेश आहे.

हे वाचा; खरीप हंगामी पैसेवारी जाहीर पहा यंदाची पैसेवारी paisevari 2023

या अधिसूचनेनुसार, या 41 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा वाटप केला जाईल. पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पिक विमा वितरणासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.  25% पिक विमा कंपनीने या कालावधीत शेतकऱ्यांना खात्यात वितरित करावा अशा सूचना जारी केले आहेत.

तालुका महसूल मंडळ
अंजनगावसुर्जी अंजनगाव, सातेगाव, भंडार, विहीगाव, कापूस, सतळणी, कोकडा
भातुकली आष्टी, खोलापूर, पूर्णानगर, भातुकली, निंभा, आसरा
धामणगाव धामणगाव, अंजनवती, दत्तापूर, मंगळूर, चिंचोली, भातुकली
चिखलदरा चिखलदरा, सेमाडोह, डेभुसोडा, चुर्णी, गौलखेडा, हाथरू
चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे, आमला, घुईखेड, सातेफळ
धारणी धारणी, सावलीखेडा, धुळघाट
दर्यापूर येवदा, वडने, गंगाई, रामतीर्थ, दर्यापूर, सामदा, थिलोरी, खल्लार, दारापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *